नवी दिल्ली – काँग्रेस आणि भाजपमध्ये आता अॅपवरुन युद्ध सुरु झालं असल्याचं दिसत आहे. कारण काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या नमो अॅपवर टीका केल्यानंतर आता राहुल गांधीवर भाजपच्या वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी निशाणा साधला. ‘अॅपकडून वैयक्तिक माहिती अॅक्सेस करण्याबाबत मागितलेली परवानगी म्हणजे हेरगिरी नाही, हे तर छोटा भीमलाही सांगायची गरज नसल्याचा टोला स्मृती इराणींनी ट्विटरवरुन लगावला आहे. तसेच ‘तुम्ही सांगता, त्याच्या विरुद्धच तुमची टीम वागते, असं दिसत आहे. कारण नमो अॅप डिलीट करण्याऐवजी काँग्रेसचंच अॅपच डिलीट केलं असल्याचं समोर आलं आहे.
.@RahulGandhi ji, even ‘Chhota Bheem’ knows that commonly asked permission on Apps don’t tantamount to snooping.
— Smriti Z Irani (@smritiirani) March 26, 2018
दरम्यान नरेंद्र मोदी यांचं अधिकृत मोबाईल अॅप ‘नमो’च्या माध्यमातून भारतीयांचा डेटा अमेरिकेतील कंपन्यांना विकला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र काँग्रेस पक्षाच्या अधिकृत अॅपमधून भारतीयांचा डेटा सिंगापूरला जात असल्याचा दावा फ्रान्सच्या हॅकरने केला आहे. त्यामुळे काँग्रेस तोंडघशी पडली असून यावर स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत
COMMENTS