मुंबई – लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या मोहिते पाटलानंतर आती आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील चार नेते शिवसेना-भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे नेते जर शिवसेना-भाजपमध्ये गेले तर सोलापूर जिल्ह्यात आघाडीला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.
रणजित शिंदे
दरम्यान माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे भाजपमध्ये जाणार असल्याचीचर्चा आहे. रणजित शिंदे हे आगामी विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.
सिध्दाराम म्हेत्रे
तसेच काँग्रेसचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत सिध्दाराम म्हेत्रे
हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सिध्दाराम म्हेत्रे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारत भालके
तसेच काँग्रेसचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारत भालके
हे देखील पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहेत. आगामी विधानसभेला ते भाजपच्या मार्फत शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. त्यांनी 2004 साली शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.
रमेश कदम
त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ विधानसभेचे आमदार रमेश कदम हे देखील शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. आगामी विधानसभेसाठी ते शिवसेनेतून लढण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS