बुधवारी १ नोव्हेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्राच्या ७० लाख रुपयांच्या लुटीमध्ये धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मुख्य आरोपी आणि रक्कम पोलिसांच्या ताब्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ याच्या घरात घरात ही रक्कम सापडल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मासाळसह तिघांना अटक कली आहे. बँकेचा मॅनेजर अमोल भोसले याच्याशी हातमिळवणी करत पैसे लुटल्याचा बनाव केला होता.
बुधवारी दुपारी महाराष्ट्र बँकेचे ७० लाख रुपये पंढरपूर जवळील खर्डी गावानजीक लुटले होते . भर दुपारी आणि रहदारीच्या रस्त्यावर ही लूट झाल्याने पोलीस चक्रावून गेले होते . पण २४ तासाच्या आताच पोलिसांना तपासात यश आले आहे.
घटना घडल्यानंतर बँकेच्या संबंधित व्यक्तीचं यामध्ये असल्याचे अंगुलीनिर्देश केले होते . जिल्हा पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक निखिल पिंगळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या पथकाने हि यशस्वी कामगिरी पार पाडली आहे .
COMMENTS