काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर !

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर !

नवी दिल्ली – काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली होती. परंतु सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोनिया गांधी आपली मुलगी प्रियांका वड्रासोबत शिमलामध्ये गेल्या होत्या, त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार त्यांना दिल्लीत आणण्यात आलं आहे.  शिमलामधील थंड वातावरणामुळे सोनिया गांधीची प्रकृती बिघडली असल्याचं बोललं जात आहे. शिमलामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडला असल्यामुळे त्याठिकाणचे तापमान घसरलं असून मोठ्याप्रमाणात थंडी वाढली आहे.

दरम्यान सोनिया गांधी आपली मुलगी प्रियंका गांधी यांच्यासोबत शिमला येथे बांधत असलेल्या बंगल्‍याचे काम पाहण्यासाठी गेल्या होत्या. गुरूवारी रात्री त्यांना अस्‍वस्‍थ वाटू लागल्याने इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज हॉस्‍पिटलमध्ये हलविण्यात आले. यानंतर त्यांना डॉक्‍टरांनी चंदीगडला पाठवण्यात आले. डॉक्‍टरांनी त्यांची तब्बेत स्‍थिर असल्याचे सांगितले आहे. मागील ऑक्‍टोबर महिन्‍यातही त्‍यांची तब्बेत बिघडली होती तेव्‍हाही त्या शिमलामध्येच होत्या.

 

COMMENTS