‘या’ दोन राज्यातही सपा, बसपाची युती, जागा वाटपही निश्चित !

‘या’ दोन राज्यातही सपा, बसपाची युती, जागा वाटपही निश्चित !

लखनऊ – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात युती केल्यानंतर आता समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) ने आणखी दोन राज्यात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील लोकसभा निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान मध्य प्रदेशात लोकसभेसाठी 29 जागा आहेत. तर उत्तराखंडमध्ये 5 जागा आहे.  मध्य प्रदेशात समाजवादी पार्टी फक्त तीन जागा लढवणार आहे. तर बाकीच्या बहुजन समाज पार्टी लढवणार आहे. मध्य प्रदेशातील बालाघाट, टीकमगड, खजुराहो या तीन जागांवर समाजवादी पार्टीचे उमेदवार असणार आहेत. दुसरीकडे, उत्तराखंडमध्ये समाजवादी पार्टीने फक्त एकाच जागेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येथील पौडी गढवाल मतदार संघातून समाजवादी पार्टी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे.

तसेच उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने आघाडी केली आहे.  हे दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात 80 पैकी 76 जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. हे दोन्ही पक्ष यातील प्रत्येकी 38 जागा लढवणार आहेत. तर दोन जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत. याशिवाय अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात उमेदवार उभे न करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे.

COMMENTS