मुंबई – एसटी कर्मचाऱ्याचा संप आज चौथ्या दिवशीही सुरू आहे. राज्य सरकार संप मिटवण्यात अपयशी ठरले आहे. यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून मुंबई उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दलच्या उच्चस्तरीय समितीचं काय झालं? असा सवाल कोर्टाने विचारला. एसटी संपाचा आज चौथा दिवस आहे. या संपावर ठोस पावलं उचलली का ? अशी विचारणाही कोर्टाने केली आहे. एसटीचा संप सुरू असताना सरकारने लोकांसाठी काय पर्यायी व्यवस्था सुरू केली का ? सरकार काहीच करत नाही त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होतोय,अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं आहे.
#MSRTC Strike: Bombay High Court orders the Maharashtra Government to come out with concrete steps by 4:30 pm today
— ANI (@ANI) October 20, 2017
COMMENTS