“ताजमहाल म्हणजे कब्रस्तान”

“ताजमहाल म्हणजे कब्रस्तान”

‘ताजमहाल म्हणजे एक  कब्रस्तान आहे. ताजमहाल हा स्थापत्य कलेचा कितीही सुंदर नमुना असला तरीही त्याची प्रतिकृती लोक घरात ठेवणे अशुभ मानतात.’ असे ट्विट हरयाणाचे विज्ञान तंत्रज्ञान मंत्री अनिल विज यांनी केलय. त्यामुळे ताजमहाल या विषयावरून सुरू असलेल्या वादात आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. 

भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवर लागलेला डाग आहे असे वक्तव्य केले होते. उत्तर प्रदेशातील पर्यटन स्थळाच्या यादीतून ताजमहालचे नाव योगी आदित्यनाथ सरकारने हटवले आणि यावरून वाद सुरू झाला.  बादशहा शहाजान याने आपल्या वडिलांना तुरुंगात डांबले, त्याला भारतातून हिंदूंचे अस्तित्त्व मिटवायचे होते.. असे लोक आपल्या इतिहासाचा भाग कसे असू शकतात? असा प्रश्न करत ताजमहालाचे नाव हटवण्यात आले. दरम्यान, ताजमहाल हे महादेवाचे मंदिर आहे असा दावा भाजप नेते विनय कटियार यांनी केलाय. ताजमहालाचे नाव शेकडो वर्षांपूर्वी ‘तेजो महाल’  होते असे कटियार यांनी म्हटले आहे.  ताजमहाल या विषयावरून सुरू असलेल्या वादात आता अनिल विज यांनीही उडी घेतली आहे. त्यांच्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS