हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर उद्या विधिमंडळाचे अधिवेशन संपवणार ?

हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर उद्या विधिमंडळाचे अधिवेशन संपवणार ?

मुंबई – भारत-पाकिस्तानमध्ये सुरु असलेलल्या तणावासंदर्भात देशासह राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या विधीमंडळाचे अधिवेशन संपवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विनियोजन विधेयक संमत करून अधिवेशन संपवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या सकाळी 10 वाजता होणार्‍या सर्वपक्षीय बैठकीत अधिवेशन संपवण्याबाबत चर्चा करण्यात येणार असून देशातील परिस्थिती पाहता अधिवेशन उद्याच संपवण्याची सरकारी पक्षाचीही भूमिका आहे.

दरम्यान भारत-पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील अनेक भागात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. अधिवेशनात मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा व्यस्त असते, ही सुरक्षा यंत्रणा इतरत्र वापरण्यासाठी उद्या अधिवेशन संपवण्याची शक्यता आहे. मुंबईत सुरू असलेले विधिमंडळाचे अधिवेशन संपवण्याची विनंती पोलीसांनी विधिमंडळाला केली आहे.  अधिवेशनाच्या बंदोबस्तात 5 हजार पोलीस व्यस्त आहेत. याशिवाय अधिवेशनावर येणाऱ्या मोर्चांसाठी 1500 पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर हा पोलीस बंदोबस्त इतरत्र वापरता यावा यासाठी अधिवेशन संपवण्याची पोलीसांनी विनंती केली आहे.

COMMENTS