राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित, एकनाथ खडसेंची वर्णी लागणार ?

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित, एकनाथ खडसेंची वर्णी लागणार ?

मुंबई  राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला असून येत्या घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच १० ऑक्टोबरला फडणवीस सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असल्याची माहिती आहे.

दरम्यान गेली काही महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा अनेक वेळा रंगली आहे. परंतु येत्या 10 ऑक्टोबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं निश्चित झालं असल्याची माहिती आहे. तसेच एकनाथ खडसे यांचं या मंत्रीमंडळ विस्तारात कमबॅक होणार नसल्याचं बोललं जात आहे.तसेच कृषीमंत्रीपद हे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान सध्या भाजप शिवसेनेमधील मंत्री वाटपानुसार आणि पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे भाजपाच्या मंत्रिपदाच्या एकूण चार जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी सेनेचा १२ मंत्र्यांचा कोटा आधीच पूर्ण झाला आहे. त्यामुळे भाजप त्यांच्या कोट्यातील चार जागा भरणार का याकडेही लक्ष लागलं आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराच्या दोन दिवस अगोद याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठक घेणार असल्याची माहिती असून त्यानंतरच ते याबाबतची माहिती देणार असल्याचं बोललं जात आहे.

 

COMMENTS