राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय 

1) मेट्रो मार्ग 9 (दहिसर ते मिरा-भाईंदर) आणि मेट्रो मार्ग 7 अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) या मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीस मान्यता.

2) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शस्त्रक्रिया-उपचारांसाठी मिळणाऱ्या विमा निधीपैकी 20 टक्के रक्कम संबंधित डॉक्टर-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यास मान्यता.

3) यवतमाळ आणि मौजे पेठ (ता. वाळवा जि. सांगली) येथे अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय (Food Technology College) स्थापन करण्यास मान्यता.

4) राज्यात जागतिक दर्जाचे इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटीज (IEDU’s) स्थापन करण्यासाठी विविध सोयी-सुविधा देण्यात येणार.

COMMENTS