राज्य आर्थिक अडचणीत असताना जाहिरातींवर मात्र होणार कोट्यवधींची उधळपट्टी ! 

राज्य आर्थिक अडचणीत असताना जाहिरातींवर मात्र होणार कोट्यवधींची उधळपट्टी ! 

मुंबई – राज्य आर्थिक अडचणीत असताना, विकास कामांना कात्री लावली जात असताना, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यायला सरकारकडे पैसै नाहीत, मात्र जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांची उळपट्टी करणार आहे. पुढच्या पाच महिन्यांसाठी सरकारी जाहिरातींसाठी सरकारने तब्बल 26 कोटी 33 लाख रुपयांची तरतूद केली आहे. शासकीय योजनांच्या लाभार्थींच्या घरावर सरकार स्टीकर लाणणार आहे. त्यासाठीही तरतूद करण्यात आली आहे.  डिजिटल होर्डिग्ज,  सोशल मिडियावर प्रसिद्धी,  वृत्तपत्र,  टीव्ही,  रेडिओवर जाहीरातींसाठी तरतुद यामध्ये करण्यात आली आहे. तसंचशासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी प्रदर्शन भरवण्यासाठीही पैशांची तरतुद करण्यात आली आहे.  एकीकडे राज्य अडचणीत असल्यामुळे विकास कामांना कात्री लावली जात आहे.  याच आठवड्यात जिल्हा विकास निधीचे पैसेही सरकारने कर्जमाफीसाठी परत मागवले आहेत. तर दुसरीकडे प्रसिध्दीसाठी अशी कोट्यवधींची तरतुद केली जात आहे.

COMMENTS