माथाडी कामगारांसमोर सरकार झुकलं !

माथाडी कामगारांसमोर सरकार झुकलं !

मुंबई –  माथाडी कामगाराच्या बंदनंतर राज्य सरकारने निर्णय बदलला असून सरकारने राज्यातील 36 बोर्ड एकत्रिकरण करण्याचा आणि किरकोळ उद्योगातून माथाडी कायदा वगळण्याचे दोन्ही जीआर रद्द केले आहेत. बुधवारी मंत्रालयात कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि माथाडी नेत्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच माथाडी कायद्याच्या मजबुतीसाठी नेमलेल्या अभ्यास गटात माथाडी नेत्याचा ही समावेश करण्यात आला असल्याची माहिती आहे.

दरम्यान सरकारनं घेतलेल्या या निर्णयानंतर गुरुवारी माथाडी कामगारांच्या 36 संघटनांची कृतीची बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारच्या निर्णयावर भूमिका ठरवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळांचे विलिनीकरण करून एकच माथाडी मंडळ स्थापन करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करण्याचं सरकारचं धोरण होतं. परंतु हे धोरण माथाडी कायदा आणि माथाडी कामगार चळवळ मोडीत काढणारे असल्यामुळे रद्द करण्याची मागणी माथाडी कामगारांनी केली होती. त्यासाठी राज्यभरातील माथाडी कामगारांनी लाक्षणिक बंद पुकारला होता. या बंदनंतर आता सरकार झुकलं असल्याचं पहावयास मिळालं आहे.

COMMENTS