“शेतकरी आत्महत्या करत असताना विकासकामांची उद्घाटने कसली करता !”

“शेतकरी आत्महत्या करत असताना विकासकामांची उद्घाटने कसली करता !”

मुंबई- राज्यामध्ये दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत़ यावर भाजप सरकार काहीच करीत नाही, शेतकरी स्वत:हून सरण रचून आत्महत्या करीत आहेत, मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मंत्री राज्यभर उद्घाटन करीत फिरत आहेत, हे सरकारला शोभते का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अनिल पवार यांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या परभणी दौ-याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या तुघलकी भूमिकेचा निषेध केला तर पोलिसांनी परभणीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतलं आहे. सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नाहीत आणि त्याबाबत कुणी आवाज उठवला तर कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते याचा निषेधही पवार यांनी केला आहे.

दरम्यान शेतकऱ्यांना बोंडअळीचे अनुदान मिळालेले नाही, राज्यातील शेतकऱ्यांना अत्यल्प पीक विमा मिळाला नाही. अशा परिस्थितीत सरकार गंभीर नाही अशी टीकाही त्यांनी केली.राज्यकर्त्यांना याबाबाबत काहीच वाटत नाही याचं दुःख असल्याचं ते म्हणाले. गेल्या २४ तासात राज्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यवतमाळमधील माधव रावते या शेतकऱ्याने स्वत:ची चिता रचून आत्महत्या केली आहे. त्यामुळ सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही अशी धोकादायक परिस्थिती राज्यात निर्माण झाली असल्याचं ते म्हणाले आहेत.

COMMENTS