मुंबई – लॉकडाऊनमुळं गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले सलून दुकानं सुरू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. सोमवारपासून ही सलून दुकानं अटी शर्थीसह सुरू होणार आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्यावरही सलून दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळं या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलीय. राज्यात आर्थिक अडचणीमुळं 12 सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. त्यामुळं ही दुकानं सुरू करावी, हा विषय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवारमांडला. त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
COMMENTS