राज्यात लोकसभेच्या शिवसेनेला फक्त दोन तर भाजपला 23 जागा मिळणार – सर्व्हे

राज्यात लोकसभेच्या शिवसेनेला फक्त दोन तर भाजपला 23 जागा मिळणार – सर्व्हे

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. याचबरोबर काही संस्थांकडून आगामी निवडणुकीसाठी सर्व्हे करण्यात आले आहेत.नुकताच काही दिवसांपूर्वीच व्हीडीपी असोसिएशनने एक सर्व्हे केला असून या सर्व्हेनुसार राज्यात शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. शिवसेनेला राज्यात फक्त दोन जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान राज्यातील लोकसभेच्या एकूण 48 जागांबाबत हा सर्व्हे करण्यात आला असून यामध्ये शिवसेनेला दोन तर भाजपला 23 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचबरोबर काँग्रेसला 12, राष्ट्रवादीला 08 तर इतरला 3 जागा मिळतील असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला आहे.

व्हीडीपी असोसिएशनच्या सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जादू कायम असल्याचं दिसत आहे. कारण राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी तब्बल 23 जागा भाजप युतीशिवाय जिंकेल असा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत सर्वात मोठा फटका शिवसेनेला बसणरा असल्याचा अंदाज आहे. कारण मागच्या निवडणुकीत तब्बल 18 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला केवळ दोन जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

COMMENTS