कारखाना प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा – धनंजय मुंडे

कारखाना प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा – धनंजय मुंडे

बीड – परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या रसाची टाकी फुटुन झालेली दुर्घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेत पाच जणांचा मृत्यू होऊन अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झाला नाही. या घटनेस कारखाना प्रशासन जबाबदार असल्याने त्यांच्यावर या प्रकरणी सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

शुक्रवारी झालेल्या दुर्घटने प्रकरणी रविवारी धनंजय मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कारखाना प्रशासनाच्या दबावाखाली येऊन पोलीस प्रशासनाने त्यावेळी मुंडे यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर लोकप्रतिनिधींना घटनास्थळी जाऊ न देण्याचा हा प्रकार पोलीस मंत्र्यांच्या दबावाखाली येवून करत आहेत.  या प्रकरणी आपण सभागृहात आवाज उठवणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

तसेच या घटनेत मृत्यू झालेल्या लिंबोटा, देशमुख टाकळी, गाढे पिंपळगावं येथील कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांनी त्यांचे सांत्वन केले. घटनेत मृत झालेले कर्मचारी हे घरातील प्रमुख असल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या कुटूंबियांना तातडीने 10 लाख रूपयांची मदत द्यावी तसेच जखमींना 5 लाख रूपये मदत देण्याची मागणी ही त्यांनी केली. घटनेचे आपल्याला राजकारण करायचे नाही मात्र ज्या पध्दतीने आपल्याला रोखण्याचा प्रयत्न झाला ते पाहता कारखाना प्रशासनच या घटनेत जबाबदार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

 

COMMENTS