नववर्षापासून राज ठाकरे महाराष्ट्र दौ-यावर

नववर्षापासून राज ठाकरे महाराष्ट्र दौ-यावर

मुंबई – पक्षाची मोट बांधण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या दौ-यावर जाणार आहेत. रविवारी पक्षाचे सरचिटणीस आणि राज ठाकरे यांची पक्षांतर्गत बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे हे 2019 मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा करणार आहेत. पुढील महिनयात ते महाराष्ट्राच्या दौ-यावर जाणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

या बैठकीत पुढील वर्षाच्या वाटचालीचे नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली असून राज्यभरातील सदस्य नोंदणी अभियानासंदर्भातही चर्चा करण्यात आली असल्याचं नांदगावकर म्हणालेत.

फेरीवाल्यांसंदर्भात रेल्वे, पोलीस, महापालिका प्रशासन सध्या काम करत आहे. त्यामुळे सध्या आमच्या डोक्याला कोणताही ताप नसून परिस्थिती बिघडली असं दिसलं तर आम्ही आहोतच असंही बाळा नांदगावकर त्यावेळी म्हणालेत.

 

COMMENTS