साईबाबा नेत्यांना सुदबुद्धी द्या, मुनगंटीवारांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला !

साईबाबा नेत्यांना सुदबुद्धी द्या, मुनगंटीवारांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला !

अहमदनगर – मंत्रालायतील उंदीर घोटाळ्यावरुन भाजपमध्ये आता संघर्ष पेटला असल्याचं दिसत आहे. कारण यावरुन आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. साईबाबा नेत्यांना सुदबुद्धी द्या अशी प्रार्थना मुनगंटीवार यांनी साईचरणी केली आहे. मंत्रालयात 3 लाख उंदीर मेले नाहीत तर तेवढ्या गोळ्या ठेवल्या होत्या आणि जेवढ्या गोळ्या ठेवल्या तेवढे उंदीर मेले असा अर्थ काढणं चुकीचं असून योग्य अर्थ काढण्याची बुद्धी राजकीय नेत्यांना देवो हीच साई चरणी प्रार्थना असल्याचा अप्रत्यक्ष टोला मुनगंटीवार यांनी खडसेंना लगावला आहे.

दरम्यान शिर्डीत रामनवमी उत्सवाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं, यानंतर  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते.  काल भाजपा आमदार राम कदम यांनी रोखठोकमध्ये एकनाथ खडसे यांचे सर्व दावे फेटाळून लावले होते. तसेच मंत्रालयातील उंदीर घोटाळा भाजपाचे आमदार चरण वाघमारे यांनी समोर आणला असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे या उंदीर पुराणावरून भाजपामध्येच आता संघर्ष पेटला असल्याचं दिसत आहे.

 

 

 

COMMENTS