मंत्रालयासमोर आणखी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न !

मंत्रालयासमोर आणखी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न !

मुंबई- मंत्रालयाबाहेर आणखी एका व्यक्तीनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. धुळ्यातील बबन झोटे या व्यक्तीनं अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान धुळे महापालिकेतील नोकरी प्रकरणी बबन झोटे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. गेली काही दिवसांपासून ते महापालिकेतीन नोकरीबाबत त्रस्त असल्याची माहिती आहे. याबाबत त्यांनी अनेकवेळा प्रशासनाकडे दाद मागितली होती. परंतु प्रशासनानं त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे. दरम्यान गेली काही दिवसांपासून मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करण्याची प्रकरणं वाढली असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.

COMMENTS