मुंबई – शेतकरी सुकाणू समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यी भेट घेऊ त्यांना निवेदन दिलं आहे. त्यावेळी या सदस्यांनी शेतकरी कर्जमाफी बद्दल तसच हमीभावाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच एक मार्च पासून राज्यात असहकार आंदोलन छेडणार असल्याचं जाहीर केलं आहे.
दरम्यान वीज बिल न भरणे, कर्ज न भरणे असं या आंदोलनाचं स्वरूप असणार आहे. तसेच या आंदोलनाला राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी पाठिंबा दर्शवला असून सरकार विरोधात 1 मार्चला पुन्हा जोरदार आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. शेतक-यांच्या या आंदोलनामुळे राज्य सरकार पुन्हा अडचणीत सापडणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS