नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकसभेत गळाभेट घेतली. याबाबत काँग्रेसकडून राहुल गांधी यांचं कौतुक केलं परंतु लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी मात्र या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. अशा पद्धतीचे वर्तन करून राहुल गांधी यांनी संसदेच्या संकेतांचा भंग केला असल्याचं सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ‘कुणीही कुणाचीही गळाभेट घेण्याला मी विरोध करत नाही. कामकाज संपल्यानंतर तुम्ही एकमेकांना भेटत असताच. परंतु पंतप्रधान जेव्हा त्या खुर्चीवर बसलेले असतात, तेव्हा ते ‘नरेंद्र मोदी’ नसतात, तर ते देशाचे पंतप्रधान असतात. याचे भान सर्वांनीच राखायला हवे. पंतप्रधान खुर्चीवर बसलेले असताना अशाप्रकारे वर्तन करणे चुकीचे आहे. राहुल गांधींनी भाषण संपविले, त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्याजवळ गेले आणि पुन्हा जागेवर येऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली त्यामुळे हे वर्तन अतिशय चुकीचं असल्याचं सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे.
COMMENTS