विधीमंडळात जेव्हा सुनील गावस्कर येतात !

विधीमंडळात जेव्हा सुनील गावस्कर येतात !

मुंबई –  सुनील गावस्कर यांनी आज विधीमंडळाला भेट दिली आहे. सुनील गावस्कर हे विधीमंडळात येताच जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. विधानभवनाला भेट देण्यासाठी अनेक सिलिब्रेटी येतात, परंतु सुनील गावस्कर यांच्या रुपाने या अधिवेशनात क्रिकेटपटू दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्याचं पहावयास मिळालं. दरम्यान no honking मोहिमेच्या निमित्ताने सुनील गावसकर हे एका स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने एक मॅच आयोजित करत आहेत. याबाबत परिवहन विभागाचे सहकार्य घेण्यासाठी आणि निमंत्रण देण्यासाठी सुनील गावसकर विधीमंडळमध्ये आले होते. यावेळी मुख्यमंत्री यांनाही गावस्कर यांनी निमंत्रण दिले.

दरम्यान मुंबईमध्ये 24 तारखेला वानखेडे स्टेडियममध्ये no horn ok please आणि road safety अशा दोन टीममध्ये मॅच होणार आहे.या मॅचमध्ये युवराजसिंह, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, अजिंक्य रहाणे, विनय कुमार, बुमराह तसंच under 19 team चे काही सदस्य सहभागी होणार आहेत. याच मोहीमेच्या निमित्ताने गावस्कर यांनी आज विधीमंडळाला भेट दिली होती. परंतु त्यांना विधीमंडळात पाहताच अनेक तर्कवितर्क लढविले गेले असल्याचं पहावयास मिळालं .

COMMENTS