रायगड – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या जिल्ह्यात राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी अखेर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेले अनेक दिवस ते पक्षावर नाराज होते. मध्यंतरीच्या काळात ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. मात्र त्याच्याआधीच शिवसेनेच्या माजी आमदाराने भाजपमध्ये उडी मारल्याने टोकरे यांची गोची झाली होती. आता ते शिवसेनेत जाणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.
दोनच दिवसांपूर्वी जिल्ह्याती एका बड्या नेत्यांने राष्ट्रवादी सोडली होती. सिडकोचे माजी संचालत वसंत भोईर यांनी राजीनामा दिला होता. आता टोकरे यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यात तीन दिवसात राष्ट्रवादीला हा दुसरा धक्का आहे. पदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच राष्ट्रवादीमध्ये नाराजी पसरल्याचं दिसून येतंय.
COMMENTS