नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता सनी देओलनही राजकारणात एन्ट्री मारली आहे. सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला. सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.
Delhi: Actor Sunny Deol joins Bharatiya Janata Party in presence of Union Ministers Piyush Goyal and Nirmala Sitharaman pic.twitter.com/QgXwv5OrBI
— ANI (@ANI) April 23, 2019
दरम्यान भाजप प्रवेशानंतर सनी देओलनं प्रतिक्रिया दिली असून माझे बाबा ज्या प्रकारे अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत होते, त्याचप्रमाणे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे. आपल्या देशातील तरुणांच्या आणि देशाच्या विकासासाठी आपल्याला मोदींसारख्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. भाजप या परिवारासोबत जोडल्यानंतर मी जे काही शक्य आहे, ते करणार असल्याचं सनी देओलनं म्हटलं आहे. गुरुदासपूर इथे अभिनेते विनोद खन्ना भाजपचे खासदार होते. पंजाबमध्ये १३ जागा आहेत. त्यापैकी ३ जागा म्हणजेच अमृतसर, गुरुदासपूर आणि होशियारपूर भाजप लढवणार आहेत.
COMMENTS