नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टानं ताजमहलवरुन केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला चांगलच फटकारलं आहे. ताजमहलच्या संरक्षणाबाबतच्या याचिकेवरील सुनाणीदरम्यान केंद्र सरकारला फटकारण्यात आलं असून या ऐतिहासिक इमारतीच्या संरक्षणाबाबत सरकारनं कोणती भूमिका घेतल्याचे दिसत नाही.त्यामुळे एकतर आम्ही ताजमहल बंद करू किंवा तुम्ही तरी तो उद्धवस्त करून टाका, अशा कठोर शब्दांत केंद्र व राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं आहे. ताजमहलच्या संरक्षणाबाबत संसदेच्या स्थायी समितीने सादर केलेल्या अहवालानंतरही सरकारने कोणतेच ठोस पाऊल उचलले नसल्याचे मत सर्वेच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
दरम्यान आयफल टॉवरपेक्षाही सुंदर ताजमहल आपल्या देशात आहे. यामुळे देशातील विदेशी चलनाची समस्याही दूर होऊ शकते. आठ कोटी लोक आयफेल टॉवर पाहायला जातात. हा टॉवर टीव्ही टॉवरसारखा दिसतो. आपला ताजमहल त्याच्यापेक्षा कैकपटीने सुंदर आहे. जर त्याची योग्य देखभाल केली तर परकीय चलनाचे आपले संकट टळण्यास मदत होऊ शकते. तसेच तुमच्या उदासिनतेमुळे देशाचे किती मोठे नुकसान होत आहे, याची जाणीव तुम्हाला आहे का अशा शब्दांत केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयानं फटकारले.
COMMENTS