चहा विकणारा माणूस पंतप्रधान झाला याचा मलाही अभिमान वाटला –सुप्रिया सुळे

चहा विकणारा माणूस पंतप्रधान झाला याचा मलाही अभिमान वाटला –सुप्रिया सुळे

निफाड – एक चहा विकणारा माणूस या देशाचा पंतप्रधान झाला याचा मलाही अभिमान वाटला असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. परंतु साहेबही शेतकरी कुटुंबातून राजकारणात आले पण त्यांनी त्याचं कधी भांडवल केलं नाही. आपल्या कर्तृत्वावर ते मुख्यमंत्री झाले, केंद्रीय मंत्री झाले असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्या निफाडमध्ये हल्लाबोल यात्रेच्या सभेत बोलत होत्या.

 

https://twitter.com/NCPspeaks/status/964774799099809792

 

दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा आजचा तिसरा दिवस असून आज निफाडमध्ये जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यावेळी बोलत असताना त्यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने गावोगावच्या लोकांना भेटता येत आहे. त्यांच्या प्रेमाचा ओलावा जाणवतोय. लोकांना आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षा आहेत. लाल दिव्यातली, हेलिकॉप्टरची सत्ता मला नको पण सामान्य माणसाच्या मनातली ही सत्ता, तिथलं मंत्रालय मला हवं असल्याचं वक्तव्य केलं आहे. तसेच पंतप्रधानांना आमचे तीनच प्रश्न असून राफेल विमानांची किंमत किती? दोन सरकारमध्ये नाही तर एक कमिटी स्थापून हा व्यवहार केला जातो, तो तसा का केला गेला नाही? आणि हिंदुस्थान एरॉनॉटिक्स असताना बाहेरच्या कंपनीतर्फे हे काम का केलं जात आहे?  असंही त्यावेळी बोलत असताना सुळे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS