मुंबई – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.राज्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था तीच असून राज्यातील खड्डे बुजवण्याचा राज्य सरकारनं केलेला दावा खोटा असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच खोटे बोला पण रेटून बोला अशीच राज्य सरकारची अवस्था असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
तसेच शुक्रवारी कोंडवा येथे भरदिवसा तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला या घटनेवरुनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील महिलांची सुरक्षा व्यवस्था वा-यावर असून पुण्यातील महिलांच्याही सुरक्षेचा विषय गंभीर असल्याचं त्या म्हणाल्या. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था दिसत नसल्याचंही त्या म्हणाल्या.
गुजरात विधानसभेचा निकाल काही तासांवर आला आहे. त्याठिकाणी वेगळं काही घडू शकते असे संकेतही त्यांनी दिले आहेत. तसेच राहुल गांधी यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. सोनिया गांधी या वरिष्ठ नेत्या असून त्यांचं मार्गदर्शन पक्षाला फायद्याचं ठरेल असंही सुप्रिया सुळे यांनी त्यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS