सुप्रिया सुळे यांचा ‘सेल्फी विथ खड्डा’, चंद्रकांत पाटलांना टोला

सुप्रिया सुळे यांचा ‘सेल्फी विथ खड्डा’, चंद्रकांत पाटलांना टोला

राज्यात खड्ड्यांच्या बाबत आंदोलने सुरू असताना आता सुप्रिया सुळेंनीही या प्रश्नाकडे लक्ष केले आहे. खड्ड्यांमुळे वाढलेले अपघात आणि यात गेलेले निष्पाप बळी यांना जबाबदार कोण हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. माननीय मंत्रीमहोदय चंद्रकांत पाटील यांनी ‘खड्डे दाखवा आणि हजार रूपये मिळवा’ असं आवाहन केलंय, तर चला त्यांच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देऊया अशी  टीकाही त्यांनी केली. त्यांनी पुण्यातल्या कात्रज-उंड्री बायपासवर जाऊन खड्ड्यांसोबत सेल्फी काढले.

COMMENTS