ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भातील बैठकीनंतर सुरेश धस म्हणाले “सन्मानानं बोलवून दारात आल्यावर थोबाडीत हाणायचं आणि माघारी निघा म्हणायचं, ही कोणती पद्धत! “

ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भातील बैठकीनंतर सुरेश धस म्हणाले “सन्मानानं बोलवून दारात आल्यावर थोबाडीत हाणायचं आणि माघारी निघा म्हणायचं, ही कोणती पद्धत! “

पुणे – ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भातील बैठक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पार पडली. साखर संघ, कामगार संघटना आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. या बैठकीनंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागण्या मान्य झाल्या की नाहीत ते मागून येणारे सांगतील. परंतु मुकदमांचे संसार उघड्यावर येऊ नयेत म्हणून मी माझ्या संघटनेचा संप स्थगित करीत आहे. आम्ही दीडशे टक्केवाढीची मागणी केली आहे किमान 85% वाढ मिळावी त्याच्याखाली आम्ही येणार नाही आज आम्ही शरद पवारांचा समोर आमची भूमिका मांडली असून आज आम्हाला संपर्क स्थगित करावा लागत आहे. मात्र आमची मागणी मान्य न झाल्यास दोन महिन्यानंतर आम्ही पुन्हा फडावर आंदोलन करू असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

COMMENTS