तळेगाव –  नगराध्यक्षांच्या पतीचा माजी नगरसेवकावर हल्ला

तळेगाव –  नगराध्यक्षांच्या पतीचा माजी नगरसेवकावर हल्ला

तळेगाव – माजी नगरसेवक प्रकाश ओसवाल यांच्यावर नगराध्यक्षांचा पती संदीप जगनाडे यांनी हल्ला केला आहे. यांच्यात निवडणूक खर्चाच्या वादातून आज सकाळी 5.30 वाजता धक्काबुक्की झाली. यात माजी नगरसेवकाच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे.

तळेगाव दाभाडे येथील भाजपच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचे पती संदीप जगनाडे व भाजपचेच माजी नगरसेवक प्रकाश ओसवाल यांच्यात आज सकाळी घरासमोरील रस्त्यावर जोरदार वाद झाला. वाद विकोपाला जाऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. त्यात मोटारसायकल पडताना ओसवाल यांच्या बोटाला गंभीर दुखापत होऊन रक्त आले, अशी माहिती आहे.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

 

 

COMMENTS