तामिळ राजकारण, अण्णा दुराई ते रजनिकांत व्हाया सिनेमा !

तामिळ राजकारण, अण्णा दुराई ते रजनिकांत व्हाया सिनेमा !

तामिळनाडूच्या राजकारणातून सिनेमा वगळला तर त्याचं उत्तर शून्य येतं असं म्हटलं तर ते अतिशोक्ती ठरणार नाही. याचं कारण तामिळनाडूच्या राजकारणात अगदी पहिल्या मुख्यमंत्र्यांपासून ते अगदी जयललितांच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत सर्वच मुख्यमंत्री हे सिनेमाशी संबंधित होते. तामिळनाडूच्या राजकारणावर आजपर्य़ंत दोन्ही द्रविडी पक्षांचा वरचष्मा राहिला आहे. या दोन्ही पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री हे सिनेमातून पुढे राजकारणात आलेले आहेत.

तामिळनाडूचे पहिले मुख्यमंत्री अण्णा दुराई हेही सिनेमाशी संबंधित होते. अण्णा दुराई आणि डीएमकेचे अध्यक्ष करुणानिधी हे त्या काळात गाजलेले चित्रपट लेखक होते. त्यांच्या चित्रपटांचा तामिळनाडूच्या समाजमनावर प्रंचड मोठा पगडा होता. तामिळनाडूच्या चित्रपटसृष्टीतील लेडन्ड म्हणून ओळख असलेल्या शिवाजी गणेशन आणि एस एस रामचंद्रन यांना अण्णा दुराई आणि करुणानिधी यांनीच ब्रेक मिळवून दिला. त्यांची पहिलीच फिल्म सुपर डुपर हिट झाली.

त्याच काळा एम जी रामचंद्रन नावाचा नवा सितारा तामिळनाडूच्या सिनेमासृष्टीत चमकत होता. रामचंद्रन हेही डीएमकेमध्येच होते. मात्र अण्णा दुराई यांच्या निधनानंतर ते डीएमकेपासून दुरावले. त्याचवेळी करुणानिधी यांनी त्यांचा मुलगा एम के मुथु यांना पक्षात प्रोजेक्ट करण्याचा प्रय़त्न केला. त्यामुळे नाराज एम जी रामचंद्रन यांनी डीएमकेमधून बाहेर पडून अण्णा द्रमुक या पक्षाची स्थापना केली. तेंव्हापासून तामिळनाडूच्या राजकारणात दोन द्रविड पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली.

एम जी रामचंद्रन यांच्या अण्णा द्रमुक या पक्षाचं ऑल इंडिया अण्णा द्रमुक म्हणज्येच एआयएडीएमके असं नामकरण 1972 मध्ये करण्यात आलं. त्यानंतर 1977 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत  एम. जी रामचंद्रन यांच्या एआयएडीएमकेला बहुमत मिळालं आणि रामचंद्रन मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एम जी रामचंद्रन यांची जादू तामिळनाडूच्या राजकारणात सुरू होती. पुढील तब्बल 3 निवडणुका त्यांनी जिंकल्या. रामचंद्रन याचं 1987 मध्ये निधन झालं. तोपर्य़ंत ते मुख्यमंत्री होते. 1984 मध्ये त्यांनी काँग्रेससोबत युती केली होती. त्या युतीला 234 पैकी तब्बल 195 जागा मिळाल्या होत्या.
एम जी रामचंद्रंन यांच्या निधनानंतर एआयएडीएमचे पक्षात फूट पडली. काही आमदारांनी रामचंद्रन यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांना पाठिंबा दिला. तर काहींनी रामचंद्रन यांच्या को स्टार आणि अभिनेत्री जे जयललिता यांना पाठिंबा दिला.  पुढच्या काळात जयललिता यांनी पक्षावर पकड मिळवली आणि त्यांनीही मुख्यमंत्रीपद भूषविलं होतं.


तामिळनाडूच्या दोन पक्षीय राजकारणाला छेद देण्याचा प्रय़त्न आणखी एक अभिनेता विजयकांत यांनी केला. दोन्ही पक्षाच्या भ्रष्टाचाराला कंटाळून त्यांनी तामिळनाडूमध्ये 2005 मध्ये नव्या पक्षाची स्थापना केली. डीएडीएमके या प्रादेशिक पक्षाची स्थापना त्यांनी केली. त्या पक्षाने 2006 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 10 टक्के मते मिळवली होती. केवळ एक वर्षाच्या हा पक्ष तामिळनाडूमध्ये तिस-या क्रमाकांचा सर्वात मोठा पक्ष झाला होता.

दोन्ही द्रमुक पक्षांना पर्याय देण्याची भाषा करणा-या विजयकांत यांच्या पक्षाने 2011 मध्ये जयललिता यांच्या पक्षाशी हातमिळवणी केली. आणि लढवलेल्या 41 पैकी 29 जागा जिंकल्या. त्या निवडणुकीत जयललितांच्या पक्षाला बहुमत मिळाले. त्यामुळे विजयकांत हे त्यावेळी विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर मात्र त्यांना पुढे फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.

रजनिकांत यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा करण्यापूर्वी आणखी एक अभिनेते कमल हसन यांनीही राजकारणा प्रवेशाचे संकेत दिले आहेत. मात्र पुढे काहीच झाले नाही. रजनिकांत यांनी आता नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना एमजी रामचंद्रन यांच्यासारखं यश मिळतं की विजयकांत यांच्या प्रमाणे अपयश येतं ते पुढील काही वर्षात स्पष्ट होईल. एकमात्र नक्की तामिळनाडूच्या राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तामिळ सिनेमात चांगलं नाव कमवावं लागेल हे नक्की !

COMMENTS