तेलंगणा – तेलंगणातील शेतक-यांना राज्य सरकारनं नववर्षाची मोठी भेट दिली आहे. शेतक-यांसाठी अविभाज्य घटक असलेली वीज आजपासून २४ तास मोफत देण्याचा निर्णय के चंद्रशेखर राव यांच्या सरकानं घेतला आहे. या मोफत विजेचा फायदा राज्यातील २४ लाख कृषिपंपांना होणार असून पुढील वर्षात ११ हजार मेगावॅट विजेची निर्मिती करण्याचा सरकारचा ध्यास आहे.बळीराजाला २४ तास मोफ वीज देणारं तेलंगणा हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. तेलंगणा सरकारनं घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या सरकारचे राज्यभरातील शेतक-यांनी आभार व्यक्त केले आहेत.
शेतक-यांना मोफत वीज देणं सरकारला शक्य आहे हे तेलंगणातील सरकारनं दाखवून दिलं आहे. खरा कृषीप्रधान देश करायचा असेल तर तेलंगणा सरकारप्रमाणे इतर राज्यांनीही शेतक-यांसाठी असा निर्णय घेणं गरजेचं आहे. तेलंगणातील सरकार शेतक-यांना मोफत वीज देऊ शकते तर इतर राज्यातील शेतक-यांना सरकार मोफत वीज का देऊ शकत नाही, असा प्रश्न आता इतर राज्यातील शेतक-यांना पडत आहे.
COMMENTS