मोदी सरकारला अभिनेत्याची धमकी, “धमक्या द्याल तर राजकारणात येईन!”

मोदी सरकारला अभिनेत्याची धमकी, “धमक्या द्याल तर राजकारणात येईन!”

बेंगळुर-  मला जर सतत धमक्या द्याल तर मी राजकारणात येईन त्यासाठी मला धमक्या देणं सोडून द्या अशी धमकीच अभिनेता प्रकाश राजनं भाजपला दिली आहे. बंगळुरूतील एका कार्यक्रमात प्रकाश राजनं भाजप सरकारला ही धमकी दिली असून या कार्यक्रमावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील उपस्थित होते. एका राजकीय स्टेजवर प्रकाश राज यांनी हे वक्तव्य केल्यामुळे कमल हसन, सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशानंतर प्रकाश राजही राजकारणात एन्ट्री मारणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

 

माझी राजकारणात जाण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु वारंवार धमक्या द्याल तर, मी थेट राजकारणात प्रवेश करीन, असं प्रकाश राजनं म्हटलं आहे. प्रकाश राज याने यापूर्वी अनेक मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. प्रकाश राजच्या या वक्तव्यामुळे कर्नाटकात याचवर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे निवडणुकांपूर्वी तो काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

COMMENTS