पंकजा मुंडेंच्या कारखान्यातील स्फोटात दोघांचा मृत्यू, सहा जणांची प्रकृती गंभरी

पंकजा मुंडेंच्या कारखान्यातील स्फोटात दोघांचा मृत्यू, सहा जणांची प्रकृती गंभरी

बीड – परळीमधील पंकजा मुंडे यांच्या कारखान्यात शुक्रवारी स्फोट झाला होता. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून सहाजणांची प्रकृती चिंताजनक आहे. वैधनाथ सहकारी साखर कारखान्या तील रसाची टाकी फुटून कर्मचारी 11भाजले होते या पैकी 2 कर्मचारी दगावले आहेत. मधुकर आदनाक(50) आणि सुभाष गोपीनाथ कराड (45) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

काल दुपारी तीनच्या सुमारास वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उसाच्या गरम रसानं भरलेल्या टाकीचा स्फोट झाला होता. त्यामध्ये एकूण 11 कर्मचारी भाजले होते. यात त्यापैकी दोन कर्मचाऱ्याचा रात्री मृत्यू झाला असून यापैकी सहा कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. लातूरच्या लहाने हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून सुमित आनंतराव भंडारे (18), सुनिल भागवत भंडारे (24), रामभाऊ माणिक नागरगोजे (25), ईश्वर देशमुख (45) अशी जखमींची नावे आहेत.

COMMENTS