दिल्ली – माजी कसोटीपटू आणि राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केलेल्या क्रीडापटूंना सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी केली आहे. सचिन यांनी यापूर्वी क्रीडा मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्याशीही याबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे आता यावर काय निर्णय होतो ते पहावं लागेल.
तेंडुलकर यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रामध्ये अऩेक क्रीडापटूंना त्यांच्या उतारवयात औषणपाण्याचा खर्च करणे अवघड होते. अनेकांची आर्थिक स्थिती बेताची असते. त्यामुळे त्यांना चांगल्या ठिकाणी उपचार घेणे शक्य होत नाही असंही म्हटलं आहे. त्यासाठी सचिन यांनी ऑलंपिकमध्ये हॉकीचे सुर्णपदक विजेत्या संघातील खेळाडू मोहमद शाहीद यांचे उदाहरण दिले आहे. योग्य उपचाराअभवी शाहीद यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यांची आर्थिक स्थिती बेताची होती. त्यामुळे त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेता आले नाहीत.
COMMENTS