मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील सिनेमाची तयारी सुरू झाली आहे. शिवसेनाप्रमुखांची भूमिका करणारा अभिनेता नवाजउद्दीन सिद्दीकीने रात्री मोतीश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. अभिनेते नवाजउद्दीन सिद्दिकी यांनी यावेळी उद्धव यांच्याशी बाळासाहेबांच्या जीवनाविषयी विविध मुद्दांवर चर्चा केली.
काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं टीझर लॉन्च झालं होतं. या कार्यक्रमाला बीग बी अमिताभ बच्चन यांनीही हजेरी लावली होती. मात्र मॉरिशसमध्ये शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे नवाजउद्दीन सिद्दीकी त्या कार्यक्रमाला हजर नव्हता. त्याने त्या कार्यक्रमासाठी व्हिडिओ पाठवला होता. मात्र यासंदर्भात प्रत्यक्ष चर्चा होऊ शकली नव्हती. त्यामुळे रात्री त्याने मोतोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित पानसे करणार आहेत. तर निर्मिती संजय राऊत करणार आहेत. 23 जानेवारी 2019 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.
The prep work starts from the right place and with the right people @ Matoshree.
It was pleasure meeting @uddhavthackeray, ji @rautsanjay61, @AUThackeray and the blessings of Shri Balasaheb Thackeray. pic.twitter.com/blHZ5TTaCY— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) March 4, 2018
COMMENTS