तुरुंगात असलेल्या रमेश कदमांसह ठाण्यातून 53 लाखांची रोकड जप्त!

तुरुंगात असलेल्या रमेश कदमांसह ठाण्यातून 53 लाखांची रोकड जप्त!

ठाणे – विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान अवघ्या काही तासांवर आलं आहे. अशातच ठाण्यात एकूण 53 लाखांची रोकड जप्त करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे घटनास्थळी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले आणि सोलापुरातील मोहोळ मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत असलेले रमेश कदम देखील सापडले आहेत. या कारवाईच्या प्राथमिक चौकशीत, रमेश कदम यांना जेजे रुग्णालयात तपासणीसाठी ठाणे कारागृहातून नेण्यात आले असल्याची माहिती आहे. तसेच निवडणूक आयोगाने ही रक्कम जप्त करुन आयकर विभागाकडे सोपवली आहे.

दरम्यान रमेश कदमला ताब्यात घेतल्यानंतर
तपासणी झाल्यावर पुन्हा तुरुंगात नेण्याऐवजी पोलीस इस्कॉर्ट पार्टी अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्याला ओळखीच्या एका माणसाच्या घरी नेले. त्याच वेळी गुन्हेशाखेच्या पोलिसांनी तिकडे धाड टाकली. त्यामुळे रोख रक्कमेसह रमेश कदम आणि एक व्यक्ती पोलिसांना सापडले आहेत. त्यामुळे नियम मोडून पोलीस गुन्हेगारांना कशी मदत करतात असा सवाल आता केला जात आहे.

COMMENTS