…तर आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, शरद पवारांच्या पावसातील सभेवरुन उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया!

…तर आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, शरद पवारांच्या पावसातील सभेवरुन उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया!

सातारा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्तेत असताना ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला नसता तर आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल साताऱ्यात भर पावसात सभा घेतली. त्यांच्या या सभेची राज्यभरात चर्चा सुरु आहे. अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघात
मतदारसंघात शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. या सभेदरम्यान पावसाला सरुवात झाली. परंतु पाऊस सुरु असतानाही पवारांनी माघार घेतली नाही. या सभेसाठी हजारो लोक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवारांचा हा उत्साह पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पवारांच्याच सभेची चर्चा सुरु झाली.

अशातच पवारांच्या या सभेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. सत्तेत असताना ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला नसता तर आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS