ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष !

ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष !

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक  सोमवारी पार पडली. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या मंजुषा जाधव तर, उपाध्याक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीमुळे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नव्या समीकरणाची चर्चा सुरु झाली आहे.

या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने मोठे प्रयत्न केले होते परंतु यामध्ये भाजपला सपशेल अपयश आलं आहे. या निवडणुकीत 53 गटांसाठी 13 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. यामध्ये 26 जागांवर शिवसेना, 16 जागांवर भाजप, 10 जागांवर राष्ट्रवादी आणि एका जागेवर काँग्रसने विजय मिळविला आहे.

COMMENTS