धुळे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसच्या माजी मंत्र्यानं धमकी दिली असल्याचा आरोप पोलीस अधिका-यानं केला आहे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी दबाव आणल्याप्रकरणी आणि धमकी दिल्याप्रकरणी आपण तणावाखाली आहे. त्यामुळे आपली बदली करण्याची मागणी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पत्र लिहून वरिष्ठांकडे केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पोलीस स्टेशन डायरीत याची नोंद घेतली आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षकांकडे मानसिक तणावात असल्यामुळे आपली बदली करण्याची मागणी हेमंत पाटील यांनी केली आहे. मलिक यांनी फोनवरून धमकावल्याचा आरोप करण्यात आला असून काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख हे देखील वारंवार दबाव आणत सरकारी कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आपली बदली करण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी वरिष्ठांकडे पाठवलेल्या पत्रात केली आहे.
COMMENTS