मुंबई – विधान परिषदेवर तुम्हाला आमदार करतो म्हणून नगरसेवकाकडे १० कोटींची मागणी करणा-या ३ जणांच्या टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांची माणसे आहोत अस सांगत ठाण्यातील भाजप नगरसेवक मनोहर डूंबरे यांच्याकड़े या तिघांनी १० कोटींची मागणी केली होती. मनोहर डूंबरे यांनी मुख्यमंत्र्यांसशी संपर्क साधला असता मुख्यमंत्र्यांनी फ्रॉड असल्याचं सांगितल्यावर आज या टोळीला काही रुपये घेताना सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे. यामधे २ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
दरम्यान ठाण्यातील भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांना या तिघांनी दहा कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न केला असून तुम्हाला आमदार बनवतो. आम्ही मुख्यमंत्र्यांची माणसं असून त्यांनी आम्हाला तुमच्याकडे पाठवलं आहे. तुम्ही दहा कोटी द्या, तुम्हाला आमदार बनवलं जाईल अशी बतावणी या भामट्यांनी मनोहर डुंबरे यांच्याकडे केली होती. परंतु याबाबतची शहानिशा करण्यासाठी डुंबरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला आणि याबाबतची माहिती दिली. परंतु अशी कोणतीही माणसं आपण पाठवली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असता डुंबरे यांनी याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर काही पैसे देतो असं सांगून डुंबरे आणि पोलिसांनी सापळा रचून या तिघांना अटक केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
COMMENTS