हा अपघात नाही, माझ्या हत्येचा कट आहे – प्रवीण तोगडिया

हा अपघात नाही, माझ्या हत्येचा कट आहे – प्रवीण तोगडिया

गांधीनगरविश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या गाडीला अपघात झाला आहे. सुरतजवळ हा अपघात झाला असून एका ट्रकने त्यांचा कारला जोराची धडक दिली आहे. प्रवीण तोगडिया हे सुखरु असून हा अपघात नसून माझ्या हत्येचा कट आहे असा आरोप त्यांनी केला आहे. जर माझी गाडी बुलेटप्रुफ नसती तर मी वाचलो नसतो असंही तोगडिया यांनी म्हटलं आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास ते करत आहेत.


दरम्यान मला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, परंतु पूर्ण सिक्युरिटी अद्याप का दिलेली नाही, असा सवाल तोगडियांनी केला आहे. तसेच मला केवळ एक व्हॅन देण्यात आली असून पोलिसांची एस्कॉर्ट व्हॅन आणि रुग्णवाहिका दिलेली नाही, असं तोगडियांनी सांगितलं.

COMMENTS