राज्यातील शेतक-यांना दिलासा, आता एसटीतून करता येणार ‘त्या’ही पदार्थांची वाहतूक!

राज्यातील शेतक-यांना दिलासा, आता एसटीतून करता येणार ‘त्या’ही पदार्थांची वाहतूक!

नागपूर – राज्यातील शेतक-यांना दिलासा देणारी बातमी आहे. यापुढे एसटीतून शेतक-यांना दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करता येणार आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत केली आहे. यापूर्वी दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करण्यास राज्यसरकारचे निर्बंध होते. त्यामुळे अनेक दुध उत्पादक शेतक-यांना वाहतुकीचा सामना करावा लागत होता.

दरम्यान एसटीतून वाहतूक करण्यास बंदी असल्यामुळे अनेक शेतक-यांचे आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे राज्य सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचं दिवाकर रावते सभागृहात बोलताना म्हणाले आहेत. तसेत दुध उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांना 50 किलोपर्यंतच्या शेतमालाची वाहतूकही निःशुल्क करण्याचा निर्णय घेतला असल्याचं रावते म्हणालेत. तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या व्यावसायिक उत्पादकांनाही विहीत नियमानुसार वेष्टण करुन मालवाहतूक करण्याची अनुमती देण्यात आली असल्याचं ते म्हणालेत.

यापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे राज्यातील सर्व एसटी आगारे व पार्सल कार्यालयांना नाशवंत पदार्थांची वाहतूक न करण्याबाबत सूचना देण्यात आली होती. त्यानुसार एसटी महामंडळाने दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करण्यास 15 नोव्हेंबर 2017 पासून बंदी घातली होती. त्यामुळे ही बंदी उठविण्याची मागणी शेतक-यांकडून केली जात होती. या मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं हा निर्णय घेतला असून त्यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS