त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष, तर इगतपुरीत शिवसेनेला यश

त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष, तर इगतपुरीत शिवसेनेला यश

नाशिक – संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल हाती आला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपला चांगलं यश मिळालं असून नगराध्यक्षपदी भाजपाचे पुरुषोत्तम लोहगावकर निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं असून भाजपचे 15 उमेदवार निवडून आले आहेत तर शिवसेनेला दोन ठिकाणी आणि एका अपक्ष उमेदवाराला यामध्ये यश आलं आहे.

तसेच इगतपुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला चांगलं यश मिळालं आहे. याठिणा भाजपला मात्र खूप कमी जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेचे एकूण १३ उमेदवार विजयी झाले असून इगतपुरीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे संजय इंदुलकर हे विजयी झाले आहेत. तसेच याठिकाणी भाजपचे ४ उमेदवार निवडून आले आहेत तर एका अपक्ष उमेदवाराला त्याठिकाणी यश आलं आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून त्र्यंबकेश्वरची ओळख आहे. इगतपुरी पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असल्याने दोन्ही नगरपरिषदा ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षांनी मोठी ताकद लावली होती. परंतु इगतपुरीच्या जनतेनं शिवसेनेला कौल दिला आहे तर त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र भाजपला चांगलं यश आलं आहे.

 

COMMENTS