आगरतळा – त्रिपुरामध्ये सुरूवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतलेल्या डाव्या पक्षाची नंतर मात्र पिछाडी झाली असून आता डाव्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे कमळ फुलताना दिसत आहे. भाजप आघाडीला तिथे तब्बल 40 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर गेल्यावेळी 49 जागा जिंकणा-या माकपला केवळ 19 जागा मिळताना दिसत आहेत. मोदी आणि शहा यांच्या रणनितीला त्रिपुरामध्ये यश येताना दिसत आहे. गेल्या 25 वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते भाजपनं करुन दाखवलं आहे.
एक्झीट पोल काय होते त्यावर एक नजर टाकूयात….
विविध एक्झीट पोलचे अंदाज
त्रिपुरा – एकूण जागा – 60
अक्सीस, माय इंडिया आणि न्यूज 24 चा एक्झीट पोल
भाजप आघाडी – 45 ते 50
डावे पक्ष – 9 ते 10
न्यूज एक्सचा एक्झीट पोल
भाजप आघाडी – 35 ते 45
डावे पक्ष – 13 ते 23
काँग्रेस – 00
सी व्होटरचा एक्झीट पोल
भाजप आघाडी – 24 ते 32
डावे पक्ष – 26 ते 34
काँग्रेस – 0 ते 2
COMMENTS