निवडणूक जाहीर झालेल्या तीन राज्यांच्या राजकीय स्थितीचा सविस्तर आढावा !

निवडणूक जाहीर झालेल्या तीन राज्यांच्या राजकीय स्थितीचा सविस्तर आढावा !

मुंबई – मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तिन्ही राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये या निवडणुका पार पडणार असून या तिन्ही राज्यांमध्ये राजकीय वातावरण जोरदार तापत असल्याचं दिसत आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला हे मतदान पार पडणार असून 3 मार्चला या तिन्ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांपासून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यातही भाजप आणि काँग्रेस आपलं सर्वस्व पणाला लावून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच मेघालयमध्ये काँग्रेसच्या पाच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मेघालयात काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. तर ही पोकळी भरून काढण्याचं काँग्रेससमोर मोठं आव्हान आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींबरोबरच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीनीही प्रचारसभांचा धडाका सुरु केला आहे.

मेघालयातील राजकीय स्थिती

2011 च्या जनगणनेनुसार मेघालयमध्ये 32 लाख मतदारसंख्या असून 50.4 महिला मतदार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) एफ आर खारकोंगर यांच्या दिलेल्या माहितीनुसार मतदारांच्या यादीत 18,30,104 मतदातांचे नावं असून यामध्ये 9,23,848 महिला आहेत. तसेच या राज्यात 74.4 टक्के नागरिक सुशीक्षित आहेत.

नागालँडमधील राजकीय स्थिती

नागालँड राज्याची लोकसख्या 2 करोडहून अधिक असून त्याठिकाणी पीपुल्स फ्रंट या पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपसमोर पीपुल्स फ्रंटचं मोठं आव्हान असणार आहे.

त्रिपुरातील राजकीय स्थिती

त्रिपुरा राज्यात भाजपसमोर कम्युनिस्ट पार्टीचं मोठं आव्हान असणार आहे. गेली 25 वर्षांपासून याठिकाणी कम्युनिस्ट पार्टीची सत्ता आहे. त्यामुळे याठिकाणच्या माणिक सरकारचं भाजपसमोर तगडं आव्हान असून या आव्हानाला भाजप आणि काँग्रेस कशापद्धतीनं सामोरं जाणार हे पाहणं गरजेचं आहे.

दरम्यान सध्या देशभरातील 18 राज्यात भाजपचं सरकार असून या तिनही राज्यात सत्ता मिळवण्यासाठी आता पंतप्रधान मोदींनी लक्ष केंद्रीत केलं आहे. परंतु गुजरात निवडणुकीनंतर भाजप आणि मोदींचं हवा कुठे तरी कमी होत चालल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपला कितपत यश मिळणार हे पुढील काळात दिसून येईल.

 

COMMENTS