नाशिक महापालिकेतील कर्मचारी, अधिका-यांना तुकाराम मुंढेंचा दणका, नाशिककरांनाही आवाहन !

नाशिक महापालिकेतील कर्मचारी, अधिका-यांना तुकाराम मुंढेंचा दणका, नाशिककरांनाही आवाहन !

नाशिक – नाशिकच्या आयुक्त पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी तुकाराम मुंढेंनी कर्मचा-यांना दणका दिला आहे. शिस्तबद्ध आणि काटेकोर वर्तवणुकीचं पालन न केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात काम न सांगता आल्याने मुंढेंनी दोन कर्मचा-यांची पगारवाढ थांबविली आहे. तर इतर कर्मचा-यांची झाडाझडती घेत काम करण्याचा इशारा दिला आहे. तसेच अनिल महाजन या अग्निशमन दलाच्या अधिका-यानं बैठकीत गणवेश न घातल्यामुळे तुकाराम मुंढे यांनी त्यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे पहिल्याच दिवशी कर्मचारी आणि अधिका-यांची चांगलीच धावपळ उडाली असल्याचं पहावयास मिळालं आहे.

दरम्यान तुकाराम मुंढे यांनी नाशिककरांनाही आवाहन केलं असून रस्त्यावरील पार्कींगसाठी पाचपट शुल्क आकारणार असून प्लॅस्टीक बंदी काटेकोरपणे राबवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कचरा विलगीकरण घरातच लोकांनी करावं असं आवाहनही त्यांनी केलं.

 

COMMENTS