नाशिक – महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर बदली करण्यात आली असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंढे यांच्या जागी राधाकृष्ण गमे यांची माहपालिका आयुक्त पदावर नियुक्ती केली असल्याची माहिती आहे. गमे सध्या उस्मानाबाद जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. मुढे यांची बदली झाली असल्याची सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान आज शासकीय सुट्टी असल्याने या बातमीची खातरजमा होत नाही. महापालिकेत बदलीचा कोणताही आदेश आलेला नसल्याची माहिती आहे. तसेच आयुक्त तुकाराम मुंढेंनी देखील याबाबत काहीही माहित नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांची बदली झाली किंवा नाही याबाबत मात्र तर्कवितर्क लढविले जात आहेत.
COMMENTS