तुळजापूर – बेकायदेशीरपणे गैरहजर राहिल्याप्रकणी तुळजापूर नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी हा निर्णय दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी तुळजापूरच्या विद्यमान नगराध्यक्षा गंगणे या एका प्रकरणात फरार होत्या. त्यांचा रजेचा अर्ज वेळेत आला नाही. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिल्याने 156, तीन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान गंगणे यांना अपात्र ठरविल्यामुळे याठिकाणी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्ह दिसत आहेत. आता यापुढील काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच अर्चना गंगणे या जनतेतून निवडून आलेल्या व अपात्र ठरलेल्या पहिल्या नगराध्यक्ष असल्याने यापुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS