मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात अजूनही आंदोलन सुरुच आहे. तसेच आत्महत्यांचं देखील सत्र सुरुच असून मराठा समाजातील आज आणखी दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे. पुरंदरमधील पिंगोरी गावातील तरुणानं आत्महत्या केली आहे.29 वर्षीय दत्तात्रय शिंदे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे – सातारा रेल्वे मार्गावर रेल्वेखाली उडी घेऊन या तरुणानं आत्महत्या केली आहे. तसेच आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचं त्याने म्हटलं आहे.
दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन लातूर-औसा तालुक्यातील तळणी येथील मराठा समाजातील २२ वर्षीय युवकानं आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. सुमित विकास सावळसुरे असं या तरुणाचं नाव असून त्याने विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैऱ्याशातून आत्महत्या करत असल्याचं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यानं म्हटलं आहे.
COMMENTS